‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’

RamMandir

टीम महाराष्ट्र देशा : केवळ हिंदू असल्याचं दाखवत जाणंव घालून काही होणार नाही, काँग्रेसने राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिर निर्माणाचा समावेश केल्यास निवडणुकीत पाठिंबा देवू, असे देखील विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघताना दिसत आहे. मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली असताना आता व्हीएचपीने देखील काँग्रेसने मंदिराला पाठिंबा दिल्यास निवडणुकीत समर्थन देण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मंदिराच्या मुद्यावर आजवर भाजपच्या पाठीशी राहणाऱ्या संघटना देखील फारकत घेताना दिसत आहेत.

दरम्यान, ज्यांच्या मनात राम नाही ते काय मंदिर बांधणार म्हणत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच आपण राम मंदिरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.