‘मुंबईच्या पावसापेक्षा जास्त रोमॅण्टिक काहीच नाही’

कंगना

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री  तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असते. अनेक विषयांवर ती आपल परखडने मत मांडत असते तर कधी यामुळे ती वादात ही अडकते. कंगना रनौत काही दिवसांपूर्वी कुटुंबासह मनालीला गेली होती. त्यानंतर गेल्या मंगळवारी ती पुन्हा मुंबईत परतली आहे. मुंबईत सकाळपासूनच पाऊस असल्याने ते पाहून अभिनेत्री कंगना रनौत रोमॅण्टिक झालीय. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

कंगना...

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तिने रोमॅण्टिक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलं, ‘मुंबईच्या पावसापेक्षा जास्त रोमॅण्टिक काहीच नाही. पण अशात सिंगल मंडळी दिवसा फक्त स्वप्नच पाहू शकतात. जो माझ्यासाठी बनलाय तो लवकर मला भेटू दे.’ या कॅप्शनमध्ये तिने रेड हार्टचं इमोजी देखील वापरलंय.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा बहुप्रतिक्षित ‘थलावी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण कोरोनात वाढ झाल्यामुळे कंगनाचा हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. थलावी २३ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. थालाईवी व्यतिरिक्त कंगनाच्या तेजस, धाकड चित्रपट देखील आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP