‘महात्मा गांधींच्या ऐवजी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हवा’

sawarkar

मुंबई : अखिल भारतीय हिंदू महासभेने नोटांवर महात्मा गांधींच्या ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच सावरकरांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्नही देण्याचीही मागणी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात देशभर साजरी करण्यात आली आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी यांनी सरकारकडे सावरकरांचे स्मरण म्हणून नोटांवर त्यांचा फोटो छापण्यात यावा. अशी मागणी केली आहे.