नोटबंदी, जीएसटी सारखे निर्णय देशाच्या भल्यासाठीच – खा. अनिल शिरोळे

Anil-Shiroles

पुणे : देशाच्या भल्यासाठी घेतलेल्या आणि जनतेने पाठिंबा दिलेल्या नोटबंदी आणि जीएसटी सारख्या धाडसी निर्णयांवर काही विशिष्ट भूमिका असल्यास यशवंत सिन्हांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अजूनही आपले मत पक्षीय पातळीवर मांडल्यास त्याचा निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, असा एक कार्यकर्ता म्हणून माझा विश्वास आहे, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.

Loading...

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी (23 नोव्हेंबर) पुणे शहरात एका कार्यक्रमात बोलताना, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही जगातील सर्वोत्तम करप्रणाली आहे. मात्र, ती कशी लागू करू नये याचे भारत हे उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका केली होती.

‘निश्चलीकरण, जीएसटी यांसारखे देशाची अर्थव्यवस्था सुदृढ आणि सक्षम करणारे निर्णय मोदी सरकारने घेतले. जागतिक पातळीवर ‘व्यवसाय सुलभता निर्देशांक’ मध्ये भारताचे उंचावलेले मानांकन तसेच ‘मुडीज’ चा सकारात्मक अहवाल हे त्याचेच द्योतक आहेत’,असेही ते म्हणाले.Loading…


Loading…

Loading...