४ ते ५ महिने नोटांचा तुटवडा भासणार- बॅंक फेडरेशनची

नोटांचा तुटवडा, क फेडरेशन

चार ते पाच महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे ‘द बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ने म्हटले आहे. देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमेतेने नोटा तयार करण्याचे काम केले तरीही बॅंकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे, असे या फेडरेशनने म्हटले आहे. यामुळे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधील आणि एटीएममधील रांगा तूर्ततरी कमी होण्याची शक्यता नाही.