विराट नव्हे तर ‘हा’ भारतीय फलंदाज आहे सर्वोत्कृष्ठ : स्टीव्ह स्मिथ

सिडनी : सध्या सर्वोत्कृष्ठ  खेळाडूंमध्ये पहिले नाव भारतीय कॅप्टन विराट कोहलीचे नाव येते. तसेच आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला जास्त पसंती मिळते. तसेच केन विलियमसन, जो रूट, स्टीव स्मिथ, विराट कोहलीसह या चौघांच नाव सर्वोत्कृष्ठ खेळाडूंमध्ये गणले जाते.

अशातच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला याला जेव्हा तुझ्या मते जगातील बेस्ट फलंदाज कोण विचारल्यावर त्याने भारतीय खेळाडूचं नाव घेतलं मात्र, त्याने यावेळी विराट कोहली नव्हे सचिन तेंडुलकरचे नाव घेतले.

स्टीव्ह स्मिथ इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. यावेळी त्याला विचारण्यात आले तुझ्या मते सर्वोत्कृष्ठ फलंदाज कोण ? यावेळी त्याने सचिन तेंडुलकर असे नाव घेतले. त्याचे कारणही त्याने यावेळी सांगितले तो म्हणाला, मी ज्याही फलंदाजाविरुद्ध आतापर्यंत खेळला आहे. त्याच्यामध्ये सचिन तेंडूलकर सर्वोत्कृष्ठ आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत मॅक्ग्रा, अख्तर, अकरम, अँडरसन, वॉर्न, मुरलीथरन सारख्या सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध रेकॉर्ड्स रचले असल्याने तो एक दिग्गज आणि बेस्ट फलंजदाज आहे असं स्मिथ म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP