आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला : निलेश राणे

nilesh rane

मुंबई : अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवं नाव असेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं आहे.

दरम्यान, मोदींचे नाव स्टेडियमला दिल्यानंतर कालपासून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली होती. ‘आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ आहेत, असा उपरोधिक निशाणा राऊत यांनी मोदींवर साधला होता.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. निलेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना, हे असले पांचट विषय बंद करावेत, असे म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेत आहेत, ते मोठेच नेते आहेत. पण, संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केलीय. पण, आक्षेप कोणाचा आहे? स्टेडियलमा मोदींचं नाव न देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का, असा सवाल राणेंनी विचारला.

तसेच, सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव होते. मग, सुब्रोतो राय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का? असेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी पांचट विषय बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला. मूळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचं ठरत आहे. त्यामुळे, हे असले विषय काढून विषय वळविण्याचा हा प्रयत्न असल्याच टीका निलेश राणे यांनी केलीय.

 

महत्त्वाच्या बातम्या