सरकारने नाही तर RSS च्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घातला होता – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई : कोरोनाने देशासह महाराष्ट्र राज्यातील कहर हा सुरूच ठेवला आहे. तर यामुळे, राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत. या परिस्थितीत एक सुखद घटना म्हणजे, धारावी या सर्वात मोठ्या हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा आता आटोक्यात आला आहे. यानंतर आता राजकीय श्रेयवाद चांगलाच रंगला आहे.

धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत. ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जिल्हयात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांची तात्काळ माहीती द्या – डीवायएसपी टिपरसे

तर काल, भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला होता. ‘आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांची जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं,’ अशा शब्दांत सरकारवर टीका केली होती.

केंद्र सरकारने १४ वित्त आयोगाचे  ग्रामपंचायतीना दिलेले ते पैसे राज्य सरकार कसे वापरू शकते? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. हे पैसे राज्य सरकारने घेता कामा नये, ते परत ग्रामपंचायतींना मिळाले पाहिजे. तसेच वित्त आयोगाने मांडलेल्या प्रस्तावावर हसन मुश्रीफ यांनी सत्कार करून घेतला, यात त्यांचं काही श्रेय नसल्याचे देखील पाटील म्हणाले. तसेच, केवळ कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सगळ्यावर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

खा.मुंडे यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई रुग्णालयासाठी मिळाले अजून 40 व्हेंन्टीलेटर