फक्त हरभजनच नाही तर वॉट्सन, केदार जाधवसह ‘या’ दिग्गज खेळाडूंना चेन्नईने सोडलं !

CSK

मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं. तर, चेन्नई सुपर किंग्जला टॉप-४ देखील गाठण्यात अपयश आलं होतं.

आज मुंबई पाठोपाठ चेन्नईने देखील ज्या खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांची नावं ट्विटरद्वारे जाहीर केले आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगला संघात न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. तर, यंदा आयपीएलचं १४ वे सत्र असून चेन्नई सुपर किंग्ज कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीच्याच नेतृत्वात खेळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

कोणकोणत्या खेळाडूंना चेन्नई संघाने रिलीज केलं ?

केदार जाधव, शेन वॉट्सन, हरभजन सिंग, मुरली विजय, मोनू सिंग यासह आयपीएल २०२० मध्ये आपल्या फिरकीच्या शैलीने खास ठसा उमटवून चर्चेत राहिलेल्या पियुष चावलाला देखील संघाने सोडल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या