कॉंग्रेसच नव्हे तर पाकिस्तान देखील करतोय मोदी सरकारचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा : आतापर्यंत देशात कॉंग्रेस आणि विरोधीपक्षांचा मोदी सरकारला विरोध होत होता. पण आता देशाबाहेरून देखील मोदी सरकारला विरोध होत आहे. देशातल्या जनतेप्रमाणे भारतातील निवडणुकीच्या निकालावर अनेक देशांचे लक्ष आहे. जे देश भारताच्या निवडणुकींच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. तर पाकिस्तानमधून मोदी सरकारचा विरोध केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तासचं शिल्लक राहिलेत आहेत. त्यामुळे देशातल्या जनतेप्रमाणे भारतातील निवडणुकीच्या निकालावर अनेक देशांचे देखील लक्ष आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून पाहिले जाते. त्यामुळे भारतात कोण पंतप्रधान होणार आणि कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भारताचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान देखील उद्याच्या निकालावर लक्ष ठेवून आहे. कारण भारतासोबतच्या सीमेवरील तणावामुळे पाकिस्तानात लोकसभा निवडणुकीबद्दल कमालीची उत्सुकता आहे. पाकिस्तानमधील राजकीय पक्ष, लष्कर आणि आयएसआय हे भारतात कोणाचे सरकार यामुळे चिंतातूर झाले आहेत. तर पाकिस्तानी नागरिक टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत नको असे मत व्यक्त करत आहेत.

Loading...

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात पुलवामा हल्ला झाला होता. त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. तर याआधी पाकीस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत भारताने उरी दहशतवादी हल्ल्याचा बदल घेतला होता. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानला ‘ईट का जवाब पत्थर से’ मिळाल्याने पाकिस्तान देखील मोदी विरोधी झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चा सुरु करण्याची चांगली संधी निर्माण होईल, असे म्हटले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात