काळ बदलला आहे हे लक्ष्यात ठेवा – अरुण जेटली

चीनच्या १९६२ युद्धाच्या इतिहासापासून धडा घेण्याच्या धमकीचा अरुण जेटलींकडून समाचार

वेबटीम : सध्या भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून देशाचे सैन्य एकमेका समोर उभे ठाकले आहेत . याच वादावरून भारताने १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाच्या इतिहासापासून धडा घ्यावा घेण्याची धमकी  चीनच्या लू कांग यांनी दिली होती  .

चीनच्या या धमकीला भारताचे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. १९६२ मधील परिस्थिती वेगळी होती तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत खूप बदल झाला असून हे लक्ष्यात घ्याव अशा शब्दांत जेटली यांनी चीनला सुनावले आहे. पुढे जेटली म्हणाले की चीन ज्या ठिकाणी रस्तेनिर्मिती करत आहे ती जमीन भूतानची आहे असं भूताननं सांगितलं आहे. भारत आणि भूतानमध्ये संरक्षण संबंध आहेत. त्यामुळं तेथे आमचे सैन्य तैनात असल्याच हि जेटली यांनी सांगितलं. आज तक या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात जेटली बोलत होते.

 

You might also like
Comments
Loading...