राजीव गांधींच्या नावाने नाही तर महान खेळाडूच्या नावाने दिला जावा खेलरत्न पुरस्कार-बबिता फोगाट

babita phogat

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणारा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ हा राजीव गांधींच्या नावाने नाही तर एखाद्या महान भारतीय खेळाडूच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाट यांनी केली आहे. यासंदर्भात बबिता फोगाट यांनी त्यांच्या ट्विटर हँटलवरुन ही मागणी केली आहे. तसेच माझी ही मागणी योग्य आहे की नाही याबद्दलसुद्धा लोकांकडून मत मागवलं आहे.ईतकंच नाही तर देशात क्रिडाविश्वातील सर्वात मोठा पुरस्कार महान खेळाडूंच्या नावाने का देण्यात येत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय हॉकीत मेजर ध्यानचंद याचं योगदान लक्षात घेता 29 अॉगस्ट हा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वर्षभरात वेगवेगळ्या खेळात प्राविण्य मिळवलेल्या राष्ट्रीय खेळाडूंना ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.यंदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला जाहीर झाला आहे.

प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारला कोरोनाची लागण

त्याच्यासोबत महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा,पँरालिंपीकपटू एम.थंगवेलू आणि महिला हॉकीपटू राणी रामपाल यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय वेगवान गोलंदाज ईंशात शर्मा,महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

३० सप्टेंबर पर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय…

आता, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या ट्विटवरुन आता एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. आता यावर क्रीडा मंत्रालय आणि केंद्र सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिर प्रवेश करु,राज ठाकरेंचा इशारा