मंत्री असल्याने मला फुकटात इंधन मिळते, दरवाढीचा फटका नाही : रामदास आठवले

माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल : रामदास आठवले

जयपूर – ”पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काहीही फरक पडत नाही”, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल .डिझेल आणि पेट्रोल मोफत मिळत असल्यानं वाढत्या दरांबाबत जास्त विचार करत नसल्याचंही आठवले यांनी जयपूर येथे बोलताना ही मुक्ताफळे उधळली आहेत.

नेमके काय म्हणाले रामदास आठवले?

‘पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल.’पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे”.

You might also like
Comments
Loading...