…तर देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाचं दैवत

विद्यापीठाला नाव दिल्याने नव्हे तर आरक्षण दिल्याने धनगर समाजाची प्रगती होईल-नारायण पाटील

टीम महाराष्ट्र देशा – धनगर समाजाची प्रगती विद्यापीठाला नाव दिल्याने नव्हे तर आरक्षण दिल्याने होईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवरकर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली .मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत देखील पाटील यांनी केलं आहे .

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या विषयावरून मोठा वाद सुरु आहे . धनगर समाजाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची मागणी लावून धरण्यात आली होती तर दुसरीकडे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांनी देखील वेळोवेळी या प्रश्नावरून आवाज उठवला होता . मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं पाटील यांनी स्वागत केलं आहे मात्र स्वागत करताना बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारा धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर जर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मार्गी लावला तर देवेंद्र फडणवीस हे आमच्या समाजाचं दैवत असतील अशी भावना त्यांनी बोलून महाराष्ट्र देशाकडे प्रतिक्रिया देताना बोलून दाखवली.

You might also like
Comments
Loading...