पंतप्रधान पदाची अपेक्षा नाही, पण सर्व विरोधकांना एकत्र आणणार : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : भाजपला पर्याय आहे अशी लोकांना अपेक्षा वाटावी यासाठी आम्ही आगामी निवडणुकीपर्यंत विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्यासह देश पिंजून काढण्याची माझी तयारी आहे, मला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही सोनिया गांधी व देवेगौडा यांनाही तशी आस नसावी,मात्र, भाजपला पर्याय देण्यासाठी मला सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायचे आहे. असं विधान एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांनी सध्य परिस्थितीची तुलना १९७५ -७७ सालाशी केली. इंदिरा गांधी यांच्या काळातही विरोधी पक्षांमध्ये दुही होती. मात्र, जयप्रकाश नारायण यांचा सल्ला मानून विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवले. त्याकाळी इंदिरा गांधीना पर्याय नव्हता असा भ्रम सर्वत्र पसरला होता आणि आता मोदींच्या बाबतीत नेमकी हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता विरोधकांनी राष्ट्रव्यापी आघाडीऐवजी राज्यस्तरावर एकत्र येण्याकडे लक्ष केंद्रित करावं.

पंतप्रधान कोण असेल, हा प्रश्न तुर्तास बाजूला ठेवून. सध्या व्यवहारिक दृष्टीकोनातून राज्यस्तरीय युत्या कराव्यात, असा पर्याय पवारांनी सुचवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींशी झालेल्या चर्चेवरुन त्यांच्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे वाटते, असेही पवारांनी सांगितले. मात्र, भाजपला पर्याय देण्यासाठी मला सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायचे आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.

bagdure

मराठा आरक्षणप्रश्नी काळजीपूर्वक सकारात्मक पावले उचलावी लागतील : शरद पवार

प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही ; शरद पवारांचा अमित शहांना खोचक टोला

 

You might also like
Comments
Loading...