‘ऑक्सिजनच्या अभावामुळे नाही तर सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि निर्लज्जपणाचे हे बळी’

kahnaiyya kumar

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान आता यावर CPI चा युवा नेता कन्हैय्या कुमार यांनी देखील भाष्य केले आहे.

‘साहेब बरोबर म्हणाले, लोक ऑक्सिजनच्या अभावामुळे मरण पावले नाहीत! खरं तर, सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि निर्लज्जपणामुळेच त्याचा मृत्यू झाला.’ अशा आशयाची फेसबुक पोस्ट करून कन्हैय्या कुमार यांनी मोडी सरकारवर टीकास्त्र डागलेले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला आहे. फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती. सत्य आणि संवदेनशीलतेची कमतरता होती व आजही आहे, असे गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP