fbpx

सदाभाऊंसारखं मंत्रिपद मलाही मिळेल, गुलामी करणं जमत नाही : बच्चू कडू

अहमदनगर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जळजळीत टीका केली. “सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही.” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. आमदार बच्चू कडू यांनी शेतमालाचा भाव, कर्जमाफीवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं.आज आमदार बच्चू कडू अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या वाटेला जाल तर उभा चिरु, असा म्हणणारा कार्यकता तयार झाला पाहिजे, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला. त्याचबरोबर सरकार तुमच्या घराला सोन्याची कौले बांधून देऊ शकते, मात्र तुमच्या मालाला भाव देऊ शकत नाही, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.