नॉस्टेल्जिक अनुभव देणारा “चिठ्ठी” १९ जानेवारीला प्रदर्शित होणार!

टीम महाराष्ट्र देशा : आजवर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली, शब्दांचा वापर झाला आहे. मात्र,नव्वदच्या दशकात गाजलेल्या”दिलवाले” या चित्रपटातील सीन्स रितसर परवानगी घेऊन “चिठ्ठी” याचित्रपटात वापरण्यात आले आहेत. या चित्रपटातून अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अभिनेता  शुभंकर एकबोटे ही नवीन फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री अश्विनी गिरी यांना या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट सह्हायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती ही त्यांनीच केली आहे.वैभव काळुराम डांगे यांनी याचित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनीया चित्रपटाचं लेखन केलं आहे.”चिट्ठी” चित्रपटात एक धमाल प्रेमकथा पहायला  मिळणार आहे. एका तरूणानं त्याच्या प्रेयसीला पाठवलेली”चिठ्ठी” तिला मिळतच नाही आणि   त्यानंतर काय गोंधळ होतो, या आशय सूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.

Loading...

नव्वदचे दशक “दिलवाले” या चित्रपटानं गाजवलं होतं.त्यातले संवाद, गाणी आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.आमच्या चित्रपटाच्याकथानकात “दिलवाले”चा महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. कारण या  चित्रपटातील अभिनेत्यावरही या “दिलवाले”चा प्रभाव  झाला आहे. त्यामुळे चित्रपट धमाल झाला आहे. प्रेक्षक ते प्रसंग नक्कीच एन्जॉय करतील,’ असं दिग्दर्शक वैभव डांगे यांनी सांगितलं.

‘चिठ्ठी’ या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत साधी, ‘गर्लनेक्स्ट डोअर’ अशी आहे. या चित्रपटाची लेखिका स्वरदा बुरसेनं माझं नाव या भूमिकेसाठी सुचवलं. मात्र,ऑडिशन वगैरे दिल्यानंतर मला ही   भूमिका मिळाली.अतिशय धमाल, मनोरंजक असं हे कथानक आहे.प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. दिग्दर्शक वैभव डांगे आणि संपूर्ण टीम बरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता. चित्रीकरणापूर्वी आमचं एक वर्कशॉप झालं होतं. चित्रपटात बरेच अनुभवी कलाकार असल्यानं त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मजेशीर गोष्ट म्हणजे, या चित्रपटात काही लहान मुलं आहेत  त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव धमाल होता. त्यांच्या एनर्जीनं सेटवर खेळकर वातावरण असायचं. या मुलांनी केलेलं काम पाहूनआम्ही थक्क व्हायचो. प्रेक्षकांनाही हाच अनुभव येईल याची मला खात्री आहे,’ असंही धनश्रीनं सांगितलं.

अभिनेत्री धनश्री काडगावकर, अभिनेता शुभंकर एकबोटे यांच्यासह अश्विनी गिरी, नागेश भोसले, अक्षय टांकसळे, श्रीकांत यादव, राजेश भोसले, वेदांत पवार, शिवराज गोंदील, अविष्कार चाबुकस्वार, सिद्धांतघाडगे यांचा उत्तम अभिनय आपल्याला या  चित्रपटात पहायला मिळणार आहे. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना मंगेश धाकडेयांचे संगीत लाभले असून सिनेमॅटोग्राफर म्हणून रणजित माने यांनी काम पहिले आहे.  “चिठ्ठी” हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

महिला ट्वेंटी- 20 विश्वचषकात भारताचा रोमहर्षक विजय ; स्मृती मानधनाला दुखापत