नाकात नथ, केसात गजरा! रिंकू राजगुरूचा गुलाबी अंदाज

rinku rajguru

मुंबई : ‘सैराट’ या चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी झालेली नाही. रिंकू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. आता ‘सैराट’ फेम आर्चीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राज राजगुरूने सोशल मीडियावर पारंपारिक अंदाजातील काही फोटो शेअर केले आहे.

रिंकूने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून नाकात नथ आणि केसात गजरा असा सुंदर लुक केला आहे. गणेशोत्सवानिमित्त तिने हा लुक केल्याचे म्हणटले जात आहे. या लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. सध्या तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. तिचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे.

महत्वाच्या बातम्या :