Share

Maharashtra Winter Update | उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला, तर विदर्भातील ‘या’ जिल्ह्यामध्ये झाली सर्वात कमी तापमान नोंद

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी (Winter) पडायला लागली आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात सर्वत्र दहा अंशापेक्षा तापमान कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भ सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरू आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातही जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. त्याचबरोबर या गुलाबी थंडीमध्ये व्यायाम आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. विदर्भात थंडीचा कडाका चांगला जाणवत आहे. रविवारी नागपूर शहरातील तापमान 12.2 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले होते. अशा परिस्थितीमध्ये गुलाबी थंडी आता बोचरी थंडी वाटू लागली आहे. तर, दुसरीकडे हवामान खात्याकडून तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यामध्ये सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दरम्यान, विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री थंडीची हळूहळू वाढली आहे. त्यामुळे लोकांना सकाळची कोवळी ऊन हवेहवेसे वाटू लागले आहे. रविवारी नागपूर शहरांमध्ये तापमान 11.2 अंश सेल्सिअसने खाली घसरले होते. तर, सोमवारी दुपारपर्यंत शहरातील तापमान 29.99 अंश सेल्सिअस पर्यंत होते. नागपूरमध्ये सातत्याने तापमानात घट नोंदवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये नागपूरकरांची रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. त्याचबरोबर शहरात रात्रीच्या वेळी रस्ते लवकर सुमसान व्हायला लागले आहेत.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आली आहे. गोंदियाचे तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. रविवारी गोंदियामध्ये 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लहरीचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. पण तरीही महाराष्ट्रातील गारठा काही कमी झाला नाही. दरम्यान, राज्यामध्ये सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये येते काही दिवस तापमानामध्ये बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी (Winter) पडायला लागली आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात सर्वत्र दहा …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now