माहीचा आज वाढदिवस, सामान्य मुलगा ते असामान्य कर्तृत्व

      ७ जुलै १९८१ साली झारखंडमधील रांची शहरातील एका राजपूत कुटुंबात जन्म झालेला एक सामान्य मुलगा पुढच्या काही वर्षातच असामान्य कर्तृत्व गाजवून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. शालेय जीवनात फुटबॉलची आवड असलेल्या ‘महेंद्रसिंग पानसिंग धोनी’ अलगदपणे क्रिकेटकडे वळला आणि त्यातही त्याने आपला वेगळा ठसा उमटवला. सुरुवातीला प्रचंड संघर्ष करून आज त्याची अमृतफळे चाखत असलेला ‘माही’ संपूर्ण तरुण पिढीसाठी आदर्शच आहे. वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी त्याने भारतीय रेल्वेत तिकीट निरीक्षकाची नोकरीही केली आणि रेल्वेतर्फे क्रिकेटही खेळला. त्यातूनच त्याची स्वतःच्या ध्येयावरची निष्ठा अधोरेखित होते. आई, वडील, बहीण आणि मित्र या सर्वांचं पाठबळ आणि प्रचंड इच्छाशक्ती यांमुळे धोनीने उज्ज्वल आयुष्याची जडणघडण केली. त्याच्या याच कठोर मेहनतीमुळे २३ डिसेंबर २००४ रोजी बांग्लादेशविरुद्ध त्याला भारतीय एकदिवसीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

धोनी करणार या मालिकेत कारकिर्दीतील १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतके

 

m m s dhpni & sachin tendulkar
सुरुवातीच्या काळात एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याने ओळख निर्माण केली. पण त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुचवण्यातून धोनीकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्यातूनच ‘आक्रमक’ अशी ओळख असलेल्या धोनीचं शांत आणि संयमी रूप जगाला कळलं. त्याच्या याच शांत स्वभावाने त्याला सगळ्या जगाने ‘कॅप्टन कुल’ अशी पदवी दिली. त्याने हि पदवी सार्थ ठरवताना २००७ साली देशाला पहिला आयसीसी T-२० विश्वचषक जिंकून दिला. त्यापाठोपाठ २०११ साली आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले गेले आणि धोनी भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून नावलौकिकास आला. देशाला तिन्ही आयसीसी चषक जिंकून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. सोबतच आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून धोनीचेच नाव घेतले जाते. वाऱ्याच्या वेगाने केलेल्या अनेक स्टंपिंग त्याच्या सर्वोच्चतेची ग्वाही देतात. फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार असा त्रिवेणी संगम असलेला धोनी जागतिक क्रिकेटमधील युगपुरुषच!
m s dhoni
सध्या क्रिकेटमध्ये झपाट्याने बदल होत असले तरीही धोनीचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ क्रिकेटविश्व कधीही विसरू शकणार नाही. संघाचा कर्णधार म्हणून त्याने संघबांधणी अतिशय चाणाक्षपणे केली. सामना हातातून निसटत असताना एखादा धाडसी निर्णय घ्यायचा आणि सामना भारताच्या बाजूने झुकवायचा हा तर त्याच्या हातचा मळ! त्याच्या याच हुशारीमुळे भारतीय कसोटी संघ सलग २१ महिने अव्वल स्थानी राहिला. त्याच्या निर्णयक्षमतेची तुलना इतर कोणाशीही करणं केवळ अशक्य
आपल्या कर्णधारपदाचा त्याने कधीही गर्व केला नाही आणि गैरवापर तर नाहीच नाही. आजच्या सगळ्या कर्णधारांनी आणि खेळाडूंनी त्याच्या या गुणांचा आदर्श ठेऊन खेळ खेळला तर क्रिकेट अजून एका नव्या उंचीवर जाईल. पण केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी खेळणारे आजचे खेळाडू धोनीच्या शिकवणीने आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल बनवू शकतील.
m s dhoni helicopter shot
धोनीच्या या यशामुळे २००८ साली त्याला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने तर २००९ साली देशातील चौथ्या क्रमांकाच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान म्हणजे त्याच्या तपश्चर्येचं फळ होत.
काळानुसार आणि वेळेचं भान ठेवत त्याने डिसेंबर २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अचानक घेतलेल्या त्याच्या या निर्णयाने त्याचा चाहत्यांना धक्काच बसला. तसंच २०१६ साली त्याने एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीच्या हाती सोपवले आणि आता मात्र तो खेळाचा पुरेपूर आनंद लुटतोय. खरच ‘धोनी’ हे भारतीय क्रिकेटचं नवयुग ठरलं. म्हणूनच ‘महेंद्रसिंग धोनी’ हे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल हे नक्की! या क्रिकेटविरास मानाचा मुजरा आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
लेखक
अपूर्व कुलकर्णी
Loading...

 

INDvSL- रोहित शर्मा :The legend

गरुडाचे घरटे तोरणा!

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू