नोरा फेतहीला ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ च्या शूटिंगदरम्यान झाली दुखापत

नोरा फेतही

मुंबई : बॉलिवूड डान्स क्वीन नोरा फेतही तिच्या  फोटो आणि डान्स व्हिडीओमुळे बरीच चर्चेत असते. मात्र सध्या तिच्या ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात नोरा फतेही हिना रहमान ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याचा फस्ट लुक अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. दरम्यान नोराने चित्रपटामधील एक अनुभव सांगितला आहे.

चित्रपटादरम्यानच तिच्यासोबत दुर्घटना घडली होती. त्यामुळे  नोराच्या चेहऱ्यावर जखम झाली होती या जखमेसह तिने चित्रपटाच शूटिंग केलं. त्यानंतर तातडीने नोराला रुग्णालयात हलविण्यात आलं. जखम खोल झाल्यामुळे खूप रक्त गेलं होतं. त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. मात्र हा अपघात चित्रपटासाठी उपयोगी ठरला.

याविषयी नोरा म्हणाली की, आम्ही एका अॅक्शन सीनचं शूटिंग करीत होतो. यावेळी डायरेक्टर एका टेकमध्येच संपूर्ण सीन शूट करत होते. मी आणि माझे सहकलाकार आम्ही या सीनचा सराव केला. या सीनमध्ये त्यांनी माझ्या कपाळावर बंदुक धरली होती. ती बंदुक घेऊन मला त्यांना मारहाण करायची होती. सराव तर चांगला झाला होता. मात्र टेकदरम्यान सहकलाकाराने चुकून वजनदार बंदुक माझ्या चेहऱ्यावर फेकली आणि बंदुक माझ्या कपाळावर जोरात लागली. त्यामुळे माझ्या कपाळावर जखम झाली आणि खूप रक्त वाहू लागले. चित्रपटाच्या एक सीनसाठी नोराला वीएफएक्सच्या माध्यमातून कपाळावर जखम झाल्याचं दाखवायचं होते मात्र या सीनसाठी नोराने खऱ्या जखमेचा वापर केला.

नोरा डान्ससोबत बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढत आहे. आपल्या खास अंदाजाने ती प्रेक्षकांच्या मनावर नोरा राज करत आहे. नोराने तिच्या अनेक चित्रपटातील डान्समुळे खास करून तरुण वर्गाला घायाळ केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP