200 कोटींच्या फसवणुकीत नोरा फतेहीला EDचं समन्स, चौकशीसाठी हजर

nora

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही नेहमीच आपल्या डान्समुळे चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी नोरा कायदेशीर कारवाईमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. नोराला ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सुकेश चंद्र शेखरने २०० कोटींच्या फसवणूकित नोराचे नाव घेतले आहे. यामुळे नोराला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. ईडीला या प्रकरणी नोराचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहे. या संदर्भात गुरुवारी तिला समन्स पाठवण्यात आले आहे.

चौकशीसाठी नोरा दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली आहे. येथे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. असे म्हटले जात आहे की सुकेशने नोरालाही अडकवण्याचा कट रचला आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मातेही सुकेशच्या निशाण्यावर होते.

नोरा व्यतिरिक्त अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सुकेशवर जॅकलिनवर देखील फसवणूकीचा   आरोप केला आहे. ईडीने जॅकलीनला शुक्रवारी एमटीएनएल येथील कार्यालयात या संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी जॅकलीनची या प्रकरणात चौकशी झाली होती आणि आता तिला पुन्हा बोलावले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या