तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांची मांसाहारी नैवेद्याच्या आदेशावरुन माघार

वेबटीम-तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांनी रविवारी मंदिरात यापुढे मासांहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही, असा आदेश दिला होता. तुळजापूरच्या तुळजाभवनी मंदिराने मांसाहारी नैवेद्याच्या आदेशावर मागार घेतली आहे. मंदिरात पूर्वीप्रमाणे मांसाहारी नैवेद्य सुरु होणार असून मंदिराच्या पासवर चुकीचा उल्लेख झाल्याची कबुली व्यवस्थापकांनी दिली आहे..

तसंच तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी प्रवेश पास अनिवार्य केला आहे. त्यामुळे पासशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून पास घेणं आवश्यक आहे. त्या पासवर मांसाहारी पदार्थ नेऊ नयेत असं लिहिलं होतं.

खरंतर नवरात्रीमध्ये तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो. तर दसऱ्याला बोकडाचा बळी देण्याची प्रथाही आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य केला आहे. रविवार त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. कर्मचारी, भाविकांसह पुजार्‍यांनाही प्रवेशावेळी हा पास सक्‍तीचा असेल.

प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे तुळजापुरात नाराजी व्यक्‍त केली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

IMP