fbpx

शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे येत्या १८ सप्टेंबर पासून आमरण उपोषण

;महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनां

पुणे ;महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे येत्या १८ सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.  माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठविण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षांनतर दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचीअतिप्रदान रक्कम वसुली थांबवावी, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी  हे उपोषण करण्यात येणार आहे .

सोमवारी (दि. १८) दुपारी १ वाजता सेंट्रल बिल्डिंग येथील शिक्षण आयुक्त आणि माध्यमिक-उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक यांच्या कार्यालयापुढे हे आदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाचे अध्यक्ष एस. डी. डोंगरे, संजय धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.

खांडेकर म्हणाले, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची  भरती प्रक्रिया गेल्या १५ वर्षांपासून बंद असल्यामुळे शाळांतील प्रशासकीय कामांबरोबर इतर कामे ठप्प आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती वरील बंदी उठवावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून  शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप शासनाने ठोस  निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मंजूर करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस तत्काळ  संमती द्यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्याना  १२ व २४ वर्षांनतर पहिला व दुसरा लाभ तात्काळ लागू करावा, शिक्षकेतरांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यासाठी आंदोलन  करण्यात येणार आहे.