नॉन-कोविड रुग्णांना उपचार मिळत नाहीत – देवेंद्र फडणवीस

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये आढावा दौरा घेत आहेत. कालपासून ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तेथील परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालयाला त्यांनी केलं भेट दिली व रुग्णांची स्थिती समजून घेतल्यानंतर जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील काही सुचना केल्या.

एकबाजूला कोरोना बाधितांची वाढती संख्या हि राज्यासाठी चिंतेची बाब असून जे नॉन-कोविड रुग्ण आहेत त्यांना देखील योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करण्याआधी त्यांची कोरोना चाचणी केली जाते. ज्याचा अहवाल यायला २ ते ३ दिवसांचा सध्या कालावधी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार हे कोरोना अहवाल येईपर्यंत थांबवले जात असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच त्यांच्या जीवाला देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मध्ये अशा रुग्णांचा अहवाल हा २४ तासांमध्ये आला पाहिजे तसेच सिरीयस पेशंट असल्यास तात्काळ अँटीजन टेस्ट करून त्यांच्यावर उपचार झाले पाहिजेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जळगाव मधील सिव्हिल रुग्णालय हे कोविड साठी पूर्ण आरक्षित ठेवल्यामुळे नॉन-कोविड पेशंट्सना गोदावरी रुग्णालयात जावे लागते, जे दूर असून तेथे प्रचंड तक्रारी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयात या नॉन-कोविड पेशंट्ससाठी देखील व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

जामनेर मध्ये ऍम्ब्युलन्स वेळेवर न पोहोचल्याने रुग्णाचा मृत्यू झाला हि वाईट घटना असून एकूणच ऍम्ब्युलन्सची कमतरता हि जळगाव जिल्ह्यात असून महानगरपालिकेकडे केवळ १ ऍम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचे त्यांनी संगीतले. त्यामुळे जास्त ऍम्ब्युलन्सची मागणी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे फडणवीस यांनी केली आहे.

कोणाचा मंत्री कुठे फिरतोय, हे मुख्यमंत्र्यांचं कळेना ; सुजय विखेंचा टोला

कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टिकटॉक बंदी नंतर इंस्टाग्रामने आणले नवीन फिचर