सांगली : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांच्यावर असलेले अजामीनपात्र वॉरंट सांगलीच्या इस्लामपूर येतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज रद्द केले आहे. राज ठाकरेंच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र ज्यावेळी निर्देश दिले जाईल त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर राहावे लागणार आहे, असे सुनावणी वेळी कोर्टाने म्हंटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात राज्यभरातल्या विविध आंदोलनातली अनेक प्रकरणं दाखल आहेत. मागे काही वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे भरती परीक्षेवरून मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक होत हिंसक आंदोलन केले होते. याच आंदोलनाच्या प्रकरणामध्ये आता राज ठाकरेंवरील वॉरंट रद्द झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साल २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची राज ठाकरेंनी घोषणा केली. यानंतर साल २००८ मध्ये भारतीय रेल्वे भरतीमध्ये मध्ये जास्तीत जास्त मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी मनसेकडून महाराष्ट्रभर हिंसक आंदोलन करण्यात आले होते. राज्यभरात मनसेने आंदोलन करून विविध ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी सांगलीच्या शिराळा मध्ये मनसेच्या तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून राज ठाकरे, तानाजी सावंत आणि काही जाणांवर हे गुन्हे दाखल झाले होते.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<