Share

Navneet Rana । नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट! नेमकं काय आहे प्रकरण?

Navneet Rana । मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे.

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 7 नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर नेमकी काय कारवाई करतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रकरण नेमकं काय? 

अमरावतीच्या (Amravti) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी रद्द केलं आहे. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळं नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा  यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप नवनीत राणा यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत नवनीत राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे. याचबरोबर मुंलूंड पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. शिवडी कोर्टाने याबाबचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Navneet Rana । मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now