टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक मोबाईल (Mobile) कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह आपले मोबाईल बाजारात लाँच करत असते. अशा परिस्थितीत HDM ग्लोबलच्या नोकिया (Nokia) ब्रँड ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नोकियाने आपला नोकिया G60 5G (Nokia G60 5G) हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला आहे. नोकियाचा हा फोन 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सुसज्ज आहे. नोकिया G60 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 (Android 12) वर काम करतो. तर हा स्मार्टफोन Snapdragon 695 या प्रोसेसर बाजारात उपलब्ध आहे.
नोकिया G60 5G (Nokia G60 5G) फीचर्स
नोकिया G60 5G या स्मार्टफोनच्या लूक आणि डिझाईन बद्दल बोलायचे म्हटले, तर हा फोन नोकियाच्या जुन्या लूक ऐवजी फ्लॅट बॉडीसह तयार करण्यात आलेला आहे. हा मोबाईल iPhone 12 सिरीज सारखा दिसतो. या फोनमध्ये 20Hz रिफ्रेश रेट, फुल-एचडी+ रिझोल्यूशन (1080×2400 पिक्सेल), 400nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह मोठा 6.5-इंच डिस्प्ले इत्यादी फीचर्स आहे.
नोकिया G60 5G कॅमेरा
नोकिया G60 5G या एस फोनमध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा दिलेला आहे. तर यामध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर असून 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले, तर या फोनमध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी आहे. Nokia G60 5G बाजारामध्ये ब्लॅक आणि आइस कलर या दोन पर्यायासह उपलब्ध आहे.
नोकिया G60 5G किंमत
नोकिया G60 5G या स्मार्टफोनची 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि प्रमुख रिटेल आउटलेट वर प्रि-बुकिंग सर्विस उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pune Accident | पुणे हादरलं! शास्त्रीनगर येथे शिवशाही बसला भीषण आग
- Navneet Rana । “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची संपत्ती जपली नाही, ती संपत्ती शिंदेंसोबत आहे”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
- Phone Bhoot | ‘फोन भूत’ चित्रपटातील कलाकारांचा बघा ‘हा’ अनोखा हॅलोविन लुक
- Kirit Somaiya । एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या माणसाला…”
- Gulabrao Patil | सुषमा अंधारे तिन महिन्यानंतर पक्षात आलेलं बाळ ; गुलाबराव पाटलांची टीका