‘नोकिया 6’ स्मार्टफोनचा धुमाकूळ

मुंबई : ‘नोकिया 6’ स्मार्टफोनची 24 तासात 2 लाख 50 हजार जणांनी नोंदणी केली होती. नोकियाने हा स्मार्टफोन सध्या चीनमधील बाजारपेठेतच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 16 हजार 750 रुपये एवढी आहे.

‘नोकिया 6’चे फीचर्स –

– 5.5 इंचाचा स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
– 2.5D आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
– अँड्रॉईड 7.0 नोगट
– क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट प्रोसेसर
– 4 जीबी रॅम
– 64 जीबी स्टोरेज
– 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
– ड्यअल सिम
– 3000mAh  क्षमतेची बॅटरी
– 16 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
– 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा

अॅल्युमिनियम बॉडीपासून बनलेल्या ‘नोकिया 6’ स्मार्टफोनच्या होम बटनमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. उत्तम साऊंडसाठी डॉल्बी एटमॉस टेक आणि ड्युअल एम्पलिफायर देण्यात आले आहे.