तालुक्यातील बेरोजगारी मुळासकट मिटवण्यासाठी रोजगार मेळावा – बाळासाहेब मुरकुटे

नेवासा / राहुल कोळसे : ‘प्रत्येक हाताला काम देऊ, प्रत्येक कुटुंबास प्रगतीपथावर नेऊ’  हे ब्रीद वाक्य घेऊन आणि भारतीय जनता पक्षाला केंद्रात व राज्यात ३ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाले आहेत या निमित्ताने नेवासा तालुकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नोकरी मेळावा आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माहीती दिली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने व बेरोजगारांना नोकरीची आवश्यकता आहे त्या दृष्टीने पुणे , औरंगाबाद , अहमदनगर येथील कंपन्या येऊन सुशिक्षीत बेरोजगरांच्या मुलाखती घेऊन त्यानां नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या हेतूने हा नोकरी मेळावा आयोजीत केला आहे .

नेवाशामध्ये या आधी पंतजली चा प्रकल्प, थायलंड येथील पोल्ट्री फिड उद्योग सुरू करण्यात आले आहेत. हा मेळावा रविवारी 8 ऑक्टोबर रोजी अहमदनगर – औरंगाबाद रस्त्यावरील नेवासा फाटा येथे असलेल्या यश मंगल कार्यालयात आयोजीत केला आहे. यामध्ये 25 ते 40 कंपन्या सहभागी होणार आहेत 10 वी ,12 वी पदवीधर उत्तीर्ण झालेले तरुण तरुणी संधीचा घेऊ शकणार आहेत.

गेल्या ३ वर्षात नेवाशा तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प उभा केले पण यातून तालुक्यातील सगळ्याच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकला नाही पण माझ्या तालुक्यातील बेरोजगारी ही समस्या मुळासकट नष्ट करण्यासाठी हा रोजगार मेळावा घेतला आहे तरी तालुक्यातील युवक युवतींनी यामध्ये सहभागी होण्याच आवाहन मी करत आहे

बाळासाहेब मुरकुटे – आमदार ( नेवासा )