राज ठाकरेंना कोणीही गृहीत धरत नाहीत : प्रमोद जठार

RAJ THACKERAY

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकारणात कोणीही गृहीत धरत नाहीत तसेच त्यांच्याच नातेवाईकांची नाणारमध्ये जमिनी असून तेथे त्यांची गुंतवणूक असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला असून याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचेही जठार म्हणाले आहेत. नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला होता व आक्रमक भूमिका मांडत भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले होते. परंतु आता जठार यांनी केलेल्या आरोपांमुळे राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री पण विरोध करतात व आमदार कार्यकर्ते तर आंदोलनाची भाषा करत आहेत, मात्र सरकारमध्ये राहून मंत्रीपदे उपभोगायची आणि सरकारचे लाभार्थी बनून जनतेच्या डोळात धुळ फेकायची. त्यापेक्षा सत्तेचा त्याग करून दाखवा असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी शिवसेनेला दिले व त्यांनाही कडक शब्दात खडसावले आहे. तसेच जिल्हात विकासाचे जे चांगले काम होत आहे. त्याला भाजपचे नेहमी सहकार्य राहीले आहे. त्यामुळे खासदार नारायण राणे जे रूग्णालय सुरू करत आहे. त्याला भाजपच्या उघडउघड शुभेच्छा आहेत असेही जठार म्हणाले, तसेच नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकारणात कोणीही फारसे गृहीत धरत नाहीत अशी टिकाही जठार यांनी शेवटी परत केली.Loading…
Loading...