fbpx

जगातील अनेक देशांकडे पाकिस्तानची धाव पण कोणीच उभ करेना !

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एअर स्ट्राईक द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने देखील आपल्या वायुसेनेचा वापर करत भारताच्या सीमे लगतच्या काही भागांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न भारताने परतावून लावला. यासाऱ्या हल्ला-प्रतीहाल्ल्यामुळे भारत – पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भारताच्या धडाकेबाज कारवाई मुळे पाकिस्तान चांगलाच भयभीत झाला आहे. पाकिस्ताने आज देशातील सर्व विद्यापीठ बंद ठेवली तर आंतराष्ट्रीय विमानाची उड्डाणे देखील रद्द केली आहेत.

पाकिस्तान आता भारतापासून वाचण्यासाठी जगातील अनेक देशांकडे मदत मागतो आहे पण पाकिस्तानला कोणीच उभ करत नाहीये तर सर्व देश पाकिस्तानला दहशतवादी कारवाया थांबवा असा मोलाचा सल्ला देत आहेत. तसेच मित्राने म्हणजेच चीनने देखील पाकिस्तानला लाथाडल आहे. भारताच्या फक्त एका कारवाईमुळे पाकिस्तान चांगलेच नरमले आहे.