fbpx

‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही’

बोरिवली – काही घडलं की आपण विचार करतो. त्या मुलीने काय घातले होते, कुठे गेली होती, कधी गेली होती. खरंतर कुणालाही ते विचारण्याचा अधिकार नाही. सुरक्षित राहणं हा तिचा जन्मसिध्द हक्क आहे. असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते बोरिवली येथील एम. के. वालिया कॉलेजमध्ये बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की,  मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना स्वरक्षणाचे धडे थोडक्यात शिकवणे हे माझे मिशन आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज  बोरिवली येथील एम. के. वालिया कॉलेज व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डीफेन्सचे शिबीर घेतले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कॉलेज व शाळेतील विद्यार्थ्यांशी सवांद साधला. विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.

काही घडलं की आपण विचार करतो. त्या मुलीने काय घातले होते, कुठे गेली होती, कधी गेली होती. खरंतर कुणालाही ते विचारण्याचा अधिकार नाही. सुरक्षित राहणं हा तिचा जन्मसिध्द हक्क आहे. असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी म्हणले.