fbpx

आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच चालतो – नरेंद्र मोदी

narendra modi

नवी दिल्ली:  दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांकडून पाळण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. काही ठिकाणी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावरून देशात वातावरण चांगलेच पेटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरकारची भूमिका मांडली.

नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे जनक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आमच्या सरकारशिवाय इतर कोणीही यथोचित सन्मान केला नाही. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच चालत आहोत. शांती आणि ऐक्य हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. याबरोबरच आम्ही समाजातील गरीबात गरीब व्यक्तींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.

2 Comments

Click here to post a comment