देशाचा पुढील पंतप्रधान कोण हे कोणीच सांगू शकत नाही – बाबा रामदेव

टीम महाराष्ट्र देशा : देशातल राजकीय घडामोडी आवर्जून लक्ष घालणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांनी आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत एकच खळबळ उडून दिलेले आहे. सध्याची राजकीय स्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. तसेच देशाचा पुढील पंतप्रधान कोण असेल यावरही भविष्यवाणी करू शकत नाही असे सांगत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून येतील याबाबत खात्री वाटत नसल्याचे सुतोवाच केले आहे.

मंगळवारी ते मदुराईला आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी काही प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी भारत हा जातीयवादी देश नाही आणि केवळ हिंदुंचाही देश नाही, असे स्पष्ट केले.

देशातील राजकीय परिस्थिती खडतर बनली असून पुढचे पंतप्रधान कोण असतील याबाबत काहीच सांगू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलेले नाही आणि कोणाला पाठिंबाही किंवा विरोधही केलेला नाही. आम्हाला जातीयवादी किंवा हिंदूंचा देश नकोय, तर अध्यात्मिक देश हवा आहे, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले.