प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कोणाचा बापही हरवू शकत नाही

टीम महाराष्ट्र देशा :  बीड आणि परळी येथून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या मोठ्या फरकाने निवडून येणार, कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, अशी टीका नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर राज्यमंत्री महादेव जानकर यांनी केली. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमात बोलत होते. .

नेमके काय म्हणाले महादेव जानकर
जो कोणी व्हाट्स अॅॅपवर म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही. भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचं कारणच नाही. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे.







Loading…




Loading...