केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दरमहा 1 हजार रुपये टाकावे : अर्थतज्ञ बॅनर्जी

-abhijeet-banergee

नवी दिल्ली : नोबल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला एक उपाय सुचवला आहे. संकट परिस्थितीत सरकारने थेट गरिबांच्या खात्यात रक्कम टाकावी, जेणेकरून कष्टकरी समजाला यातून दिलासा मिळेल. तसेच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजनादेखील सरकारानं लवकरात लवकर लागू केली पाहिजे, असेही बॅनर्जी म्हणाले.

अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी इस्टर डुफ्लो या जयपूरमधील ऑनलाइन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. “करोनाच्या संकटकाळादरम्यान सरकारला प्रत्येक भारतीला किमान १ हजार रुपये त्वरित दिले पाहिजे. तसंच पुढील काही महिने सरकारनं ही रक्कम भारतीयांना दिली पाहिजे,” असं मत त्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केलं.

वन नेशन, वन रेशन कार्डवर बॅनर्जी म्हणाले की, सरकारला युनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इन्कम तात्काळ लागू करण्याची आवश्यकता आहे. जनधन योजनादेखील याचाच एक भाग आहे. बॅनर्जी यांनी सरकारच्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेचे कौतुक केले. तर ही योजना त्वरित लागू करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तसंच जोपर्यंत लस तयार होत नाही तोवर करोनाचं संकट कायम राहणार असल्याचंही बॅनर्जी म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, भारतात सध्या मागणीची मोठी समस्या आहे. लोकांच्या हाती सध्या पैसा नाही हे त्यामागील मोठं कारण आहे. त्यामुळेच लोकं काहीही खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्यात उशिर करणं चुकीचं ठरू शकतं. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवण्याची गरज आहे. मागणी तेव्हाच वाढेल जेव्हा लोकांमध्ये खरेदी करण्याची क्षमताही वाढेल. यासाठीच लोकांच्या हाती पैसा पोहोचवणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील; राऊतांनी भाजपला दिला इशारा

काय म्हणता !… ‘ही’ राजकीय चर्चा झाली शरद पवार आणि राज्यपालांच्या भेटीमध्ये ?

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरकडे घरकाम करणाऱ्या दोघांना ‘कोरोना’ची लागण

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास गुप्त चर्चा, बैठकीबाबत राऊतांकडून मोठा खुलासा…