मुंबई: राज्य सरकारने केलेल्या नवीन नियमावलीनुसार सार्वजनिक वाहतुकीतून दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परिणामी, बेस्टचे सर्व आगार व थांब्यांवरून सुटणाऱ्या बसमधून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा दोन लसमात्राधारकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र 18 वर्षांखाली प्रवास करणाऱ्यांचे काय? त्यांनी प्रवास कसा करायचा असे प्रश्न निर्माण होत आहेत. आता यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
‘लस नाही तर बस नाही,डोकं आहे पण मेंदू नाही’ अशा आशयाचे खोचक ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यासोबतच त्यांनी बेस्ट समोर शाळकरी मुळे प्रवास करण्यासाठी विनंती करतानाचा (कार्टून) फोटोही पोस्ट केला आहे.
लस नाही तर बस नाही डोकं आहे पण मेंदू नाही pic.twitter.com/aI8AsxAT9c
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 4, 2021
दरम्यान लोकलने प्रवास करताना दोन लसमात्रा घेतलेल्यांना तिकीट किंवा पास दिला जातो. तसेच १८ वर्षांखालील इयत्ता नववी ते १२ च्या विद्यार्थ्यांना ओळखपत्राद्वारे पास व तिकीट देण्यात येते; परंतु १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणच न झाल्याने त्यांना बेस्टच्या बसमधून प्रवास करण्याची मुभा मिळणार की नाही याबाबत बेस्ट उपक्रमाने काहीच स्पष्ट केलेले नाही. बेस्टच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी ज्यांनी दोन लसमात्रा घेतलेल्या नाहीत, त्यांना बेस्ट बसमधून प्रवास करता येणार नाही, असेच स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे’
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- गुलाम नबी आझाद यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला…’
- भारतात ओमायक्रॉन आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही- डॉ. समीरन पांडा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<