‘कर नाही तर डर कशाला?’, ‘पेगासस’वरून काँग्रेसचा भाजपाला सवाल

नवी दिल्ली : पेगाससच्या माध्यमातून राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाचा खटला सध्या सर्वोच्य न्यायालयात दाखल आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिज्ञापत्र सादर करता येणार नाही असे केंद्र सरकारने सांगितले. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ‘कर नाही तर डर कशाला’ अशी टीका भाजपावर केली आहे.

काँग्रेसच्या ट्विटमध्ये पुढे लिहीले आहे की, पेगॅसस बाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास नकार देऊन मोदी सरकार नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करतय? मोदी सरकारच्या सॉलिसिटर जनरलने कोर्टात सांगितले की कोणत्या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला गेला आहे की नाही, हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही. यावरुन एकच प्रश्न उपस्थित होतो. मोदी सरकारने जर काही बेकायदेशीर केले नाही तर कोर्टाला माहीत देण्यास एवढे आढेवेढे का? कर नाही तर डर कशाला! असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ट्विटमध्ये नमुद आहे.

नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस स्पायवेअर’या संरक्षण क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या इस्रायलच्या स्पायवेअरचा वापर केल्याच्या आरोपाबाबत न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास केद्राने नकार दिला आहे.

न्यायालय या प्रकरणात अंतरिम आदेश राखून ठेवत आहे, त्यासाठी दोन तीन दिवस लागतील तुम्ही सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहात की नाही हे स्पष्ट करा. जर सरकार प्रतिज्ञापत्र देण्याबाबत फेरविचार करणार असेल तर या प्रकरणाची सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या