पवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

Uddhav thakrey and sharad pawar

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात राजकीय भूकंपाचे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी असलेली गुपित जवळीक, काँग्रेसशी विरोधी विचारधारा असलेली शिवसेना हे सगळे मुद्दे बघता राजकीय हालचाली महत्वाच्या आहेत.

काल, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घडल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. अनेक राजकीय नेत्यांसह तज्ञांनी वेगवेगळे अंदाज बांधण्यास सुरुवात केली. मात्र, आता या ‘गुप्त’ बैठकीचे कारण खुद्द संजय राऊत यांनी स्पष्ट केले असून, कालची भेट ही गुप्त पासुन पूर्वनियोजित असल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये कमालीची चलबिचल असल्याचे पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत.राऊत-फडणवीसांच्या भेटीनंतर हि तातडीची बैठक होत असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” आम्ही शासन चालवत आहोत त्यामुळे अशा बैठका होत असतात. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत. अनेक निर्णय असतात ज्यावर चर्चा करणे गरजेचे असतात. त्यामुळे भेटी या लोकहितासाठी असतात, त्यात वेगळा काही विषय नसतो त्यामुळे आश्चर्याचे कारण नाही ” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-