…तोपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही; मलिकांनी दिली कोर्टाला हमी

…तोपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही; मलिकांनी दिली कोर्टाला हमी

Nawab Malik And Sameer Wankhede

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आता आणखी एक नवा आरोप केला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिकांनी यांनी ट्विट करत समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाबत अनेक कागदपत्रे शेअर करत आरोपांची मालिका सुरु ठेवली आहे. मात्र, नवाब मलिक यांची समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर सुरु असलेली आरोपांची मालिका आता काही काळापुरती स्थगित होणार आहे. उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात दिली आहे. यामुळे अखेर वानखेडे कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आले होते. आता या प्रकरणी 9 डिसेंबरला उच्च न्यायालयात पुढील सुनावणी आहे. मलिक यांनी याबाबत कुठेही तक्रार का केली नाही?, केवळ ट्विट करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? का हे सारं निव्वळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायलसाठी? अशा सवालांची सरबत्ती न्यायमूर्ती एस. काथावालांकडून मलिकांच्या वकिलांवर यावेळी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या