‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’

nilesh rane

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.

इंद्रा सोहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.

या निर्णयावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी आता महाविकास आघडीवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलेली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका. फार मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांचा नुकसान झालेलं आहे. त्यांच भवितव्य अंधारात ढकलण्याच काम ठाकरे सरकारने केलंय. या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध!’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलेले आहे.

दरम्यान, आता मराठा आरक्षण रद्द करण्याच निकाल जाहीर होताच मराठा समाजामध्ये सध्या कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समजणे आंदोलनाचा पवित्र हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या