चेकबुक बंद करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही: अर्थ मंत्रालय

check book

टीम महाराष्ट्र देशा: नोटबंदी झाल्यानंतर केंद्र सरकार ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी चेक बुक बंद करणार असल्याची बातमी मागील काही दिवसांमध्ये सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. परंतु चेक बुक बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही व कोणताही निर्णयात यासंदर्भात होणार नसल्याचे स्पष्टीकरण खुद्द अर्थ मंत्रालयाने ट्वीट करून दिले आहे.

काही दिवसांपूर्वी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून चेकबुक बंद करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचं आणि गोंधळाच वातावरणं निर्माण झालं होतं. त्यामुळे या संदर्भात अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

‘ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार चेकबुक बंद करणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. मात्र, हे वृत्त निराधार असून तसा कुठलाही प्रस्ताव नाहीये’ असं अर्थमंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.