fbpx

लग्नास सुयोग्य जोडीदार मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे तरुणाने केली इच्छामरण देण्याची मागणी

पुणे : आई वडिलांची सेवा करणारी जोडीदार मिळत नसल्याने तसेच लग्नास नकार मिळत असल्याने पुण्यातील एका तरुणाने चक्क इच्छामरण देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदर तरुणाने इच्छामरणाची धक्कादायक मागणी केली आहे.

पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित पत्राची दखल घेतली आहे. या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळवण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे.