तुळजाभवानी मंदिरात फोटो काढण्यास, चित्रीकरणास मनाई

उस्मानाबाद : तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील शेकडो फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे मंदिर संस्थानने तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात विनापरवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरणास मनाई केली आहे. यासंदर्भातील निर्देश सुरक्षा कंपनी बीव्हीजीला दिले आहेत.

मंदिरातील फोटो तसेच चित्रीकरणाचा दुरुपयोग होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने मंदिरातील सुरक्षा कंपनी बीव्हीजीला पत्र दिले आहे. या पत्राद्वारे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात विनापरवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास मनाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तशा आशयाची नोटीस तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात डकवण्यात आली आहे.

तुळजाभवानी मातेचे फोटो मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावरून घ्यावेत. मंदिरात फोटो काढायचे असतील किंवा चित्रीकरण करायचे असेल तर मंदिर संस्थानची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, मंदिरात फोटो आणि चित्रीकरण करण्यास सामान्यांना पूर्वीपासून बंदी आहे. मात्र तरीही तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यातील फोटो, चित्रीकरण व्हायरल होतातच कसे, यावर प्रश्न निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP