fbpx

‘मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या व्यक्तीने घातपाताची चौकशी करण्यास सांगितले नाही’

टीम महारष्ट्र देशा – अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नसल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित निर्धार परिवर्तनाचा संकल्प यात्रा अहमदनगर जिल्ह्यात पोहोचली. यावेळी ते बोलत होते. मुंडे म्हणले की, आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊस मजूरांचे महामंडळ काढण्याचे सरकारने योजले होते, तेही त्यांनीच रद्द केले. औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जागा देणार होते. कुठे आहे जागा? कुठे आहे स्मारक? नुसत्या हवेत गप्पा. हा मुंडे साहेबांचा अपमान आहे, असेही यावेळी मुंडे म्हणले.