जितेंद्र आव्हाडांना कोणी गांभीर्याने घेत नाही – गावडे

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील जोरदार घणाघात केला आहे. आज कोणालाही जाणता राजा उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहित माहित नाही. पण जाणता राजा फक्त एकच छ.शिवाजी महाराज. अस म्हणत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर कोणालाही जाणते राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आणि जे त्यांना जाणते राजे म्हणत असतील ते शिवाजी महाराजच अपमान करत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांच्या या टीकेला उत्तर द्यायला गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुढे सरसावले आहेत.

Loading...

‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यावर प्रतिक्रया देताना भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव, प्रदीप गावडे यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना म्हटले, हा राष्ट्रवादी चा दुटप्पीपणा आहे, एकीकडे ज्या पुस्तकाशी भाजप चा काही संबंध नाही त्यावरून भाजप वर टीका करायची आणि दुसरीकडे महाराजांसाठी वापरली जाणारी विशेषणे पवारांसाठी वापरायची. तसेच जितेंद्र आव्हाडांना कोणी गांभीर्याने घेत नाही. तसेच जनतेचा जाणता राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशी त्यांनी पुढे म्हटलं.

महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना प्रदीप गावडे नक्की काय म्हणाले 

हा राष्ट्रवादी चा दुटप्पीपणा आहे, एकीकडे ज्या पुस्तकांशी भाजप चा काही संबंध नाही त्यावरून भाजप वर टीका करायची आणि दुसरीकडे महाराजांसाठी वापरली जाणारी विशेषणे पवारांसाठी वापरायची. परंतु जितेंद्र आव्हाडांना कोणी गांभीर्याने घेत नाही राहिला प्रश्न जाणता राजा चा तर जनतेचा जाणता राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.भाजप

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले