समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये : निलेश राणे

nilesh rane

मुंबई : ओबीसी समाजामध्ये सतत भांडण लावण्याचे काम करून काही मंडळींनी सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले आहेत. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू नये, असा ओबीसी समाजाचा हेतू मुळीच नाही. परंतु आमच्या मुळावर येईल त्यांची जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून दिला.

ते काल जालना येथील ओबीसी मोर्चात ते काल बोलत होते.आपल्यातील काही समाज थोडे पुढे गेले असतील पण भटका समाज अजूनही खूप मागे आहे. १२ बलुतेदारांची अवस्था वाईट आहे, मी विश्वासाने सांगतो बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबाबतची कारवाई सुरू केली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, जिरवाजिरवीची भाषा वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता भाजप प्रदेश सचिव निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही. कुठल्या समाजाला काय मिळेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसारच मिळेल. कुठल्याही मंत्र्याने विचार करून बोललं पाहिजे असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या