‘देशात कोणीही सुरक्षित नाही, हिंमत असेल तर सरकारने पेगासस प्रकरणी चर्चा करावी’

sanjay raut vs narendra modi

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर करतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. पण ‘द वायर’ या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असून संसदेच्या अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटत आहेत.

आता शिवसेनेनं देखील याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं सांगतानाच आम्ही या मुद्द्यावर संसंदेत आवाज उठवू. हिंमत असेल तर सरकारने आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करावी,’ असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP